लहूजी संघर्ष सेनेच्या बैठकीत विविध विषयावर चर्चा

0

पाचोरा : लहूजी संघर्ष सेनेची जिल्हास्तरीय बैठक संघटनेच्या प्रमुख पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत झाली. यावेळी या बैठकीत महत्वाचे निर्णय घेण्यात आले. सेना उपाध्यक्ष अण्णाभाऊ कांबळे, महाराष्ट्र राज्य युवकाध्यक्ष स्वप्नील सपकाळे, सरचिटणीस विलास भालेराव, संघटक गजानन चंदनशिव, नेते रामभाऊ मगरे, जेष्ठ खैरनार बाबा यांची प्रमुख उपस्थिती होती. लहूजी संघर्ष सेना जिल्हापदअधिकारी जिल्हाध्यक्ष नाना भालेराव, उपाध्यक्ष सुखदेव आव्हाड, महासचिव सुनील पाचुंदे, सरचिटणीस किशोर मरसाळे, छोटू पवार, आनंद पवार, यादव बगुल, अनिल पाचुंदे, ईश्‍वर आहीरे, अनिल आव्हाड, अनिल कांबळे, बाबूलाल बावस्कर यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते हजर होते.

आमदारांना दिले मागण्यांचे निवेदन
राज्य युवकाध्यक्ष स्वप्नील सपकाळे यांनी सांगितले की, अत्याचार विरोधात तीव्र प्रकारे लढा दिला पाहिजे, शिक्षण सर्वांत मोठा विषय असून आपण मुलांना शिकवले पाहिजे, आपल्या महिला खंबीर झाल्या पहिजे, पाचोरा येथे सभागृह झाले पहिजे याबाबत निवेदन आमदार साहेब यांना देण्यात आले. यात शासकीय योजनाबद्दल आपण चौकशी नेहमी केली पहिजे आणि मातंग समाज हा बीजनेस सुध्दा केला पहिजे, मुंबई विद्यापिठास लोकशाहिर अण्णाभाऊ साठे नाव देण्यात यावे, यांच्यासह विविध मागण्या नमूद केले आहे. मागण्या मान्य न झाल्या आंदोलनाचा इशारा लहूजी संघर्ष सेनेतर्फे देण्यात आला आहे.