लहेजामध्ये शास्त्रीय नृत्यकला व फॅशन शो यांचा अनोखा संगम

0

पुणे । पुण्यातील महा फॅशन फाउंडेशन आणि नृत्यभक्ति फाउंडेशन यांच्या वतीने भारतातील सात प्रकारचे शास्त्रीय नृत्यप्रकार व त्या संबंधित पोशाख, अलंकार व इतर सामुग्री प्रथमच ‘लहेजा’ या फॅशन शोच्या माध्यमातून सादर होणार आहे.

हा फॅशन शो येत्या 25 डिसेंबर रोजी बावधन येथील अम्ब्रोशिया हॉटेलमध्ये सायंकाळी सात वाजता संपन्न होणार आहे. लहेजा कार्यक्रमाची संकल्पना आणि निर्मिती लक्ष्मीकांत गुंड व सई परांजपे यांची आहे. गुंड यांनी आपल्या संस्थेच्या माध्यमातून नेहमीच भारतीय संस्कृती फॅशन शोच्या माध्यमातून तरुण पिढीपर्यंत पोहोचवण्याचा सातत्याने प्रयत्न केला आहे. फॅशन शो कोरिओग्राफर सत्यजीत जोगळेकर यांच्या दिग्दर्शनांतर्गत 15 मॉडेल्स आणि 7 शास्त्रीय नृत्य कलाकार पाच विविध फेर्‍यांमधून भरतनाट्यम्, कथ्थक, कत्थकली, कुचीपुडी, ओडिसी, आसामचा सत्रीया आणि मणिपुरी या नृत्यप्रकारास आवश्यक असलेले पोशाख आणि अलंकार सादर करणार आहेत. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आणि विनामूल्य आहे.