लांबेवडगांव येथे ऊसाला आग; लाखोंचा ऊस जळून खाक

0

माजी आमदार राजीव देशमुख यांनी केली पाहणी
चाळीसगाव – तालुक्यातील लांबेवडगांव परिसरात मोठ्या प्रमाणात ऊसाचे क्षेत्र असून परिसरातील उसाच्या क्षेत्रात आज दुपारी अचानक लागलेल्या आगीने रौद्र रुप धारण केले होते. यात संजय पाटील,मनोज वाणी,वामन पाटील यांच्या शेतात आग लागल्याने जवळपास ८ ते १० एकर ऊस क्षेत्राचे मोठ्या प्रमाणात उसाचे नुकसान झालेले आहे याबाबत सदर घटनेची माहीती मिळताच तालुक्याचे माजी आमदार राजीव देशमुख यांनी चाळीसगाव नगरपरिषदेच्या अग्निशमन दलास पाचारण करुन घटनास्थळी भेट देत माहीती जाणून घेतली व परिसरातील खंडीत वीजपुरवठा नियमीत सुरळीत करुन शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही. याबाबत वीज वितरण मंडळाच्या अधिकाऱ्यांना सुचना दिल्यात. यावेळी पं.स.सदस्य अजय पाटील, बाजार समिती संचालक कल्याणराव पाटील, नगरपरिषदेचे माजी उपाध्यक्ष भगवान पाटील,मिलिंद शेलार आदी उपस्थित होते.