लाईट बाजारात घाणीचे साम्राज्य,खासगी रेती पडुन

0

नवापूर । शहरातील लाईट बाजार,मेनरोड भागात तीन दिवसापासुन कचरा उचलला जात नाही अशी तक्रार या भागातील रहिवाशी व व्यापार्‍यांनी केली आहे. एकीकडे स्वच्छ भारत अभियान राबविले जात असतांना दुसरीकडे शहरातील लाईट बाजार व अन्य भागात ही घाणीचे साम्राज्य पसरले असल्याची ओरड सोशल मिडीयीवर दोन दिवसापासुन सुरु आहे. नागरीक घाणीचे फोटोच व्हाटशाँपवर, फेसबुकवर टाकु लागल्याने खर खोट समोर येत आहे.

खाजगी बांधकामाची वाळू घाणीचे आगार
घंटागाडी काही भागात येत नसल्याचा ही तक्रारी आहेत तसेच काही भागात पाणी येत नसल्याने रहिवाशी केव्हा ही नगरसेवकाचा घरी जाऊन पाणी टँन्करची मागणी करत आहे लोक आता भलतेच जागृत झाले असुन त्याचा प्रत्यय येऊ लागला आहे.शहरात काही भाग स्वच्छ तर काही भागात नेहमीच अस्वच्छता असते.नगर पालिका याकडे दुर्लेक्ष करत असुन काही नगरसेवकांचे ही आपल्या प्रभागाकडे लक्ष नसल्याचा आरोप नागरीक करु लागले आहेत घाणीमुळे शहरात डास मच्छरांचा उपद्रव वाढला आहे औषध फवारणी करण्यात आली नाही अशी तक्रार एका जागृत नागरीकाने केली आहे. तसेच लाईट बाजारात रस्त्यावर खाजगी बांधकामाची रेती बर्याच दिवसा पासुन पडलेली असुन आज पर्यत ती उचलेली नसल्याने परिसरात रेती व धुळ पसरली आहे अशी तक्रार केली जात आहे. तसेच रेतीवर कुत्रे,डुकरे,गाय येऊन घाण करीत असल्याने दुर्गधी पसरली आहे.जवळच हँण्डपंप असल्याने पाणी भरण्यासाठी ही महिलांना अडचणीचा सामना करावा लागत आहे.