लाखोंची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्या विरोधात गुन्हा दाखल

0

कल्याण : खोटे कागदपत्रांच्या आधारे लाखोंचा महसूल बुडवून शासनाला लाखोंचा गंडा घालणाऱ्या डोंबिवलीतील एका व्यापाऱ्या विरोधात विक्रीकर विभागाने विष्णू नगर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून या तक्रारिनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे .

संजय साटम असे या व्यापाऱ्यांचे नाव आहे
बनावट कागदपत्र तयार करत शासनाचा लाखोंचा महसूल बुडवणार्या व्यापाऱ्या विरोधात विक्री कर विभागाने फास आवळला आहे .डोंबिवली पश्चिमेकडील महात्मा फुले रोड वरील यशप्रभा बिल्डिंग मध्ये तळमजल्यावर संजय साटम यांची मे एस एम ऑइल नावाने कंपनी होती .या कंपणीच्या माध्यमातून संजय साटम यांनी 2009 -10,2010-11 या आर्थिक वर्षात बनावट व खोटी कागदपत्र तयार करत या बनावट कागदपत्रांच्या आधारे प्रत्यक्ष मालाची विक्री न करता केवळ या मालाची खोटी बिले खरेदीदार व्यपाऱ्याला देऊन खोट्या वजावटी द्वारे शासनाचा 70 लाख 66 हजार 947 रुपये महसूल बुडवत शासनाची फसवनुक केल्याचे विक्रीकर विभागाच्या निदर्शनास आले .याबाबत ठाणे सहाय्यक विक्रीकर आयुक्त अन्वेषण विभाग अतुल घुसळे यांनी विष्णू नगर पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली असून या तक्रारीनुसार पोलिसांनी संजय साटम विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सूरु केला आहे .