धुळे जिल्हा रुग्णालयात कारवाई ; पगार काढण्यासाठी स्वीकारली पाच हजारांची लाच
धुळे– जिल्हा सामान्य रुग्णालयातील वरीष्ठ लिपिक सुरेश वना सैंदाणे यांना पाच हजारांची लाच घेताना धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास अटक केली. तक्रारदार जिल्हा सामान्य रुग्णणालयात कर्मचारी असून त्यांचा थकीत पगार देण्यासाठी लाचेची मागणी केल्यानंतर सापळा रचून जिल्हा सामान्य रुग्णालयात आरोपीला अटक करण्यात आली. ही कारवाई धुळे एसीबीचे पोलीस उपअधीक्षक शत्रुघ्न माळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश भोरटेकर, पवन देसले आदींच्या पथकाने केली.