नंदुरबार : दहा हजाराची लाच घेताना नंदुरबार येथील महिला असलेल्या वनरक्षकासह एकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली आहे, या कारवाई ने वनविभागाच्या अधिकारी, कर्मचारी वर्गात खळबळ उडाली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नंदुरबार येथील वनक्षेत्र कार्यालयात असलेल्या वनरक्षक पिंकी भिमराव बडगुजर यांनी तक्रारदाराकडून 35 हजार रुपयांची मागणी केली होती, त्यापैकी 10 हजार रुपये जागो मंगा धनगर या खाजगी इसमा जवळून घेत असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने खोकराळे गावाजवळ रंगेहात पकडले.त्यानंतर या पथकाने नंदुरबार येथील वनक्षेत्र कार्यालयात जाऊन पिंकी भीमराव बडगुजर यांना ही अटक केली.कोळसा आणि लाकूड वाहतूक करणाऱ्या टेम्पोला सोडण्यासाठी लाचेची मागणी करण्यात आली होती. ही कारवाई नंदुरबार येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केली आहे.