जळगाव । आसोदा शिवारातील शेतात विज कनेक्शन जोडणी करण्यासाठी महावितरणच्या उपकार्यकारी अभियंता यांची आर्थिक मागणी पुर्ण न केल्याने शुक्रवारी जिल्हा पेठ पोलीसात कनिष्ठ अभियंता माधूरी पाटील यांच्या फिर्यादीवरून अवैधरित्या शेतात विज कनेक्शन घेतल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला, मात्र हा गुन्हा निव्वड आर्थीक लाभापोटी दाखल केल्याचे पीडीत शेतकरी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
असे आहे प्रकरण
नशिराबाद उपविभागातील उपकार्यकारी अभियंता श्री.खंडारे यांच्या अंतर्गत आसोदा शिवारांतर्गत गट नं. 1256 मन्यारखेडा रोड अंतर्गत शेतकरी प्रदिप पंढरीनाथ भोळे यांच्या शेतातील विहिरी शेतपंपासाठी विजपुरवठा मिळण्यासाठी 17 नोव्हेंबर 2017 रोजी आसोदा कक्षाकडे दाखल करण्यात आले. त्यानंतर महिनाभरानंतर 20 डिसेंबर 2017 रोजी नशिराबाद येथे सादर करण्यात आले. सहा महिन्याचा कालावधी होवून ही विजेचे खांब मिळाले नसल्याने शेतकरी भोळे हे उपअभियंता श्री. खंडारे यांना भेटल्यानंतर सांगितले की तुम्ही खर्च करून शेतात सहा विज खंबे उभे करा, वीस हजार रूपये द्या आणि मी तुम्हाला डिमांड नोट देतो, असे सांगितले. शेतकरी भोळे यांनी दहा हजार रूपये दिले आणि शेतात स्वःताच्या खर्चाने 6 पोल उभे केले. मात्र उर्वरीत दहा हजार रूपये पुर्ण न केल्याने उपअभियंता खंडारे यांनी कनिष्ठ अभियंता यांना हाताशी घेवून खोटा गुन्हा दाखल केला आहे. खंडारे साहेबांशी पंगा घेतला, पैसे देवून टाकले असते तर ही पोलीसात कारवाई झाली नसती, असे सांगण्यात आले.