लाडक्या स्वरीत अन् वासरुचे लडीवाळ कौतुक

0

चाळीसगाव । मुक्या प्राण्याशी स्वरीतने केलेली मैत्री जणू आपल्या स्वप्नांच्या दुनियेत अदृश्य स्वरुपातल्या जीवलगाबरोबर केलेली मैत्री कधी कधी काही गोष्टी आपल्याला एका वेगळ्या भावविश्‍वात घेऊन जातात कधी ते विश्‍व आपण अनुभवलेलं असतं तर कधी अनुभव न घेताही ते आपल्याला आपलसं वाटतं. रोज सकाळी वासराभोवतीचं आमच्या लाडक्या स्वरीतचं विलक्षण मऊमधूर खेळणं, त्यातील निरागस वात्सल्य त्यात प्राणीपणाचं भान आलेलं आहे, चांगला बदल नेहमीच आपल्याला चांगल्या त्याकडे,माणूसपणाकडे घेऊन जातो असे म्हटलं तर ते वावगे ठरणार नाही. कुटुंबातील छोटासा नायक असलेला स्वरीत आपल्या समाज रचनेचं, समाजाच्या स्वभावधर्माचं एक वेगळं चित्रण वेगळ्या स्वरुपात मांडतोय, त्याला तोड नाही. आई-वडील, आजी-आजोबा इत्यादींच्या सहवासातून आपल्या बालपणीची जडणघडण होतेय त्यातूनच उद्याचा युवक तयार होणार आहे म्हणून बालमनावर होणारे संस्कार हे अत्यंत महत्वाचे असतात. पण ते करतांना त्या बालमनाचं भावविश्‍व ओळखणं फार गरजेच असतं आणि ते किती नाजूक असतं हयाचं योग्य चित्रण करण्यात मी यशस्वी झालो आहे.

स्वरीत एखाद्या गोष्टीशी खेळतांना एकमेकांशी कुठलाही संवाद करत नाही तर त्याच्या ज्ञानेंद्रियांचा वापर करुन तो पदार्थ किंवा ती वस्तू फक्त जाणून घेत असतो, तो दोन वर्षाचं होईपर्यंत त्याच्या सामाजिक कौशल्यांचा विकास बराच जास्त झालेला आहे, आपलं म्हणणं दुस-या पर्यंत पोहोचविण्यासाठी त्याची भाषा विकसित होत आहे,तो प्रत्येकाशी संवाद करण्याचं ज्ञान अवगत करतोय. लाकडी ठोकळे किंवा तत्सम खेळ खेळत असताना एकमेकांशेजारी बसून तो वेगवेगळ्या वस्तूही त्यातून बनवू लागलाय. लहानग्यांचेही एक आगळंवेगळं विश्‍व असतं, त्यांच्याही मानसिकतेत होणारे बदल हे पुष्कळदा आजूबाजूच्या परिस्थितीवर, सहवासावर, संस्कारावर अवलंबून असतात याची जाण आपल्याला प्रत्येकाला होत असते, गोड स्वभाव, जन्मजात अंगीकृत असलेली एकाग्रता, एखाद्या गोष्टीबद्दल उत्कंठा, प्रत्येक गोष्ट जाणून घ्यायची उत्सुकता..

एक नाही तर अशा अनेक सुप्त गुणांनी सजलेला लहानगा स्वरीत अनेक गोष्टी शिकवून जातो. ज्या आजच्या युगात आपण विसरत चाललेलो आहोत. मला वाटतं की आपण मुलांकडे, त्यांच्या खेळाकडे, वाढीकडे आदराने पाहू लागलो तर त्यांचे मित्र होऊ शकतो, खर्‍या अर्थाने मूलं शिकायला, त्याच्या वाढीतला, सहजीवनातला आनंद घ्यायला शिकवत देखील असतात,अभ्यासक्रमाच्या खजिन्याची जणू गुरुकिल्लीच मला सापडलीय असं वाटतंय. हा खजिना तुमच्या आमच्यात वाटून घेतला तर अधिकच समृद्ध होईल आणि ही समृद्धी तृप्तीच्या दिशेनं नेईल, तुम्हाला आणि मलाही…..

– शब्दांकन
स्वप्नील कोतकर, चाळीसगाव