लाडशाखीय वाणी समाज विकास मंडळातर्फे रविवार गुणगौरव समारंभ

0

रहाटणी येथील थोपटे लॉन्समध्ये रंगणार कार्यक्रम

पिंपरी-चिंचवड : लाडशाखीय वाणी समाज विकास मंडळातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव व माता उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा रविवार (दि. 24) रोजी रहाटणी येथील थोपटे लॉन्स येथे दुपारी चार ते सायंकाळी सात वाजेदरम्यान होणार आहे. त्यानंतर 16 कुलस्वामिनी व कानुबाई मातेचा उत्सव सायंकाळी सात ते रात्री अकरा वाजेदरम्यान होणार आहे, अशी माहिती आयोजकांनी दिली आहे.

विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. मिलिंद येवले व डॉ. सुचिता येवले उपस्थित राहणार आहेत. विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. कानुबाई मातेचे दर्शन व महाप्रसाद झाल्यानंतर शिरपूर येथील डोंगर हिरवागार ग्रुप कानुबाईमातेच्या गीत गायनाचा कार्यक्रम सादर करणार आहेत, अशी माहिती लाडशाखीय वाणी समाज विकास मंडळाचे अध्यक्ष योगेश वसंत वाणी, उपाध्यक्ष हेमंत पोटे, सचिव विजय बागडे, खजिनदार राजेंद्र शिरुडे यांनी दिली.