रावेर । शासनाच्या विविध योजनांसंदर्भात कागदपत्रे जमा करावयाची असून ज्या लाभार्थ्यांनी आपली कागदपत्रे जमा केलेली नाही, त्यांनी ती लवकरात लवकर जमा करण्याच्या सुचना करण्यात आल्या आहेत.
तालुक्यात महाराष्ट्र शासनाकडील सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागामार्फत राबविण्यात येणार्या राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ योजना व केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी विकलांग, वृध्दापकाळ व विधवा निवृत्तीवेतन योजनेंतर्गत दर महिन्याला 600 रुपये अनुदानाचा लाभ घेत असलेल्या लाभार्थ्यांनी ज्यांचे आधार कार्डची छायांकित प्रत द्यावयाची बाकी आहे त्यांनी तलाठी यांच्याकडे 18 मार्चपर्यंत जमा करावे. सदरचे आधार कार्डची छायांकित प्रत मुदतीत जमा न केल्यास 1 एप्रिल नंतर अनुदान बंद होेण्याची शक्यता नाकारता येत नाही जे लाभार्थी आधारकार्डची छायांकित प्रत जमा करणार नाही त्यांचे अनुदान बंद झाल्यास त्याची जबाबदारी घेतली जाणार नसल्याचे सुचित करण्यात आले आहे.