नंदुरबार। येथील लायनेस क्लबच्या महाराष्ट्र प्रांत अध्यक्षा डॉ.तेजल चौधरी यांना राष्ट्रीय स्तरावरील ‘मोस्ट एक्टीव्ह प्रेसिडेंट’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. लायन्स व लायनेस क्लबचा राष्ट्रीय स्तरावरील सन्मान सोहळा नुकताच बडोदा येथे पार पडला.
यावेळी लायनेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा प्रभा जैन, अरुणा ओसवाल व विविध राष्ट्रीय प्रतिनिधींद्वारे आयोजित सन्मान सोहळ्यात नंदुरबार येथील डॉ.तेजल चौधरी यांना राष्ट्रीय स्तरावरील मानाचा ‘मोस्ट एक्टीव्ह प्रेसिडेंट’ सन्मानाने गौरविण्यात आले. संपूर्ण देशातील प्रतिनिधींमधून प्रथम पुरस्कार मिळवून नंदुरबार लायनेस क्लब व महाराष्ट्र प्रांतचे नाव राष्ट्रीयस्तरावर पोहचविल्याबद्दल डॉ.तेजल चौधरी यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. यावेळी सन्मान सोहळ्यात 13 राज्य प्रांत प्रतिनिधी व महाराष्ट्रातून नंदुरबार, धुळे, नांदेड, परभणी, औरंगाबाद, जळगांव येथील प्रतिनिधी उपस्थित होते. या सर्वांना मागे टाकून डॉ.तेजल चौधरी यांची निवड गौरवास्पद असल्याचे मत नंदुरबार लायन्स क्लबचे अध्यक्ष अनंद रघुवंशी व नंदुरबार लायनेस क्लबच्या अध्यक्षा डॉ.हिना रघुवंशी यांनी व्यक्त केले आहे.