‘लालबागचा राजा’तर्फे रविवारी सलग 18 तास रक्तदान शिबिर

0

मुंबई | लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे रविवारी, 6 अाॅगस्ट रोजी सलग १८ तास रक्तदान शिबीराचे अायोजन करण्यात आले अाहे. या रक्तदान शिबिरामध्ये बृहन्मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघाचे सदस्य, मित्रपरिवार सहभागी होणार अाहे.
या रक्तदान शिबिराची माहिती सर्वसामान्य जनातेपर्यंत पोहचविण्यासाठी संघाच्या वतीने लाखो पत्रके मोफत वितरीत केली जाणार आहेत. त्यातून काही अंशी या सामाजिक उपक्रमात हातभार लावून बाप्पाची सेवा करण्याची संधी वृत्तपत्र विक्रेत्यांना मिळणार अाहे. या रक्तदानाची नोंदणी सुरु झाली आहे. यासाठी वृत्तपत्र विक्रेत्यांनी रक्तदान करावे, असे आवाहन बृहन्मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघाने केले आहे. मित्रपरिवारास रक्तदान करवयाचे असल्यास त्यांनी त्यांचे नाव व मोबाईल नंबर नोंद करणे अावश्यक अाहे. माहितीसाठी संपर्क – ९८६९४५८३९४, ९८१९५९११५०. विक्रेते जीवन भोसले यांनी पत्रकाद्वारे ही माहिती कळविली आहे.