लाळेत जखम बरी करण्याचा गुणधर्म

0

चीलीमधील संशोधकांनी मानवी लाळ जखमा परीणामकारकपणे बऱ्या करू शकते असा दावा केलेला आहे. मेल ऑनलाईन साईटने प्रसिद्ध केल्यानुसार लाळेत जखम बरी करण्याचे औषधी गुणधर्म असतात असे संशोधकांना वाटत आहे.

लाळेत हिस्टॅरिन १ हे प्रथिन असते. संशोधकांनी प्रयोगशाळेत त्वचेच्या पेशी तयार केल्या आणि बीजधारणा झालेले कोंबडीचे अंडे वापरले. हिस्टॅरिन पेशींना पसरण्यासाठी व नव्या रक्तवाहिन्या तयार करण्यासाठी मदत करते. या प्रक्रियेलाच अँजिओजेनेसिस म्हणतात व ती जखम बरी होण्यासाठी आवश्यक असते. खरे तर तोंडातल्या जखमा लवकर बऱ्या होण्यास लाळच कारणीभूत असते पण तिचा उपयोग अन्य जखमा बऱ्या करण्यासाठी होऊ शकतो हे कुणाला माहित नसते. लाळेची ही महती फाऊंडेशन ऑफ अमेरिकन सोसायटिज फॉर एक्सपेरीमेंटल बायोलॉजीच्या एफएएसईबी जर्नल या संशोधन पत्रिकेत छापली आहे.