लिंगायत धर्मास मान्यतेसाठी केंद्राकडे प्रस्ताव

0

नवी दिल्ली : लिंगायत धर्मास संविधानिक मान्यता मिळावी आणि अल्पसंख्याक दर्जा देण्यात यावा, यासंबंधीचा प्रस्ताव महाराष्ट्र प्रदेश लिंगायत धर्म महासभेने केंद्र सरकारकडे दाखल केला आहे. केंद्र सरकारने प्रस्तावाचा सकारात्मक विचार करून लवकरात लवकर निर्णय घेण्याची मागणीही करण्यात आली आहे.

महासभेचे प्रदेश सरचिटणीस बी. एस. पाटील म्हणाले, लिंगायत धर्म हा हिंदू धर्मापासून पूर्णपणे वेगळा आहे. आमच्या चालीरीती, उपासना पद्धती, धार्मिक विधी हे हिंदू धर्मापेक्षा भिन्न आहेत. महात्मा बसवेश्वर यांनी बाराव्या शतकात लिंगायत धर्माची स्थापना केली आहे, त्यांचे तत्त्वज्ञान आम्ही मानतो. त्यामुळे आमच्या धर्मास संविधानिक मान्यता देण्याबरोबरच अल्पसंख्याक दर्जाही मिळावा, जेणेकरून आमच्या समाजास स्वतंत्र ओळख मिळेल, असेही त्यांनी सांगितले.