तळेगाव दाभाडे : येथील लिंबफाटा ते जिजामाता चौक या रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाचा शुभारंभ तळेगाव दाभाडे नगरपालिकेच्या नगराध्यक्षा चित्राताई जगनाडे, उपनगराध्यक्ष सुनील शेळके, बांधकाम समितीचे सभापती अरुण भेगडे पाटील, नगरसेवक व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
याप्रसंगी पक्षप्रतोद सुशील सैंदाणे, विरोधी पक्षनेत्या हेमलता खळदे, नगरसेवक अमोल शेटे, रोहित लांघे, इंदरमल ओसवाल, संतोष शिंदे, नगरसेविका नीता काळोखे, शोभा भेगडे, संध्या भेगडे, प्राची हेंद्रे, अनिता पवार, कल्पना भोपळे, वैशाली दाभाडे, तळेगाव शहर भाजपा अध्यक्ष संतोष दाभाडे, अजय भेगडे, गणेशआप्पा भेगडे उपस्थित होते. हा रस्ता लिंबफाटा, मारुती मंदिर चौक, दिपेश फोटो स्टुडीओपासून जिजामाता चौकापर्यंत होणार आहे. यासाठी 34 लाख रुपये खर्च होणार असून, तो नगरपालिका फंडातून केला जाणार आहे, अशी माहिती सभापती अरुण भेगडे-पाटील यांनी दिली.