लिंबायतच्या आमदार संगीता पाटील यांनी घेतल्या बर्‍हाणपूरात कॉर्नर सभा

0

रावेर- मध्यप्रदेशातील विधानसभा निवडणुकीत यश मिळवण्यासाठी भाजपाने कंबर कसली आहे. खान्देशासह राज्यातील लोकप्रतिनिधींवरही प्रचाराची जवाबदारी सोपवण्यात आली असून विधानसभा निवडणुकीत यश मिळवण्यासाठी रणनीती आखण्यात आली आहे. होम टू होम प्रचार पेक्षा कॉर्नर सभा घेण्यावरही भर देण्यात आला आहे. मराठा मतदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी भाजपाने लिंबायत (गुजरात) येथून निवडून आलेल्या मराठा आमदार संगीता पाटील व महिला मोर्चा आघाडीच्या अध्यक्षा वैशाली पाटील यांच्यावर जवाबदारी सोपवली आहे. दोघेही महिला मराठा मताधिक्य असलेल्या वस्त्यामध्ये जावून कॉर्नर सभा घेत आहे. आता पर्यंत बर्‍हाणपूर, नेपानगर, शहापूर या मोठ्या शहरांसह गाव-खेड्यात सभा घेऊन भाजपाला मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे तर या सभांना मतदारांची मोठी गर्दी उसळत आहे.