लिनियर गार्डनमध्ये विद्युत दिवे कार्यन्वित

0

नगरसेवक काटे यांच्या वाढदिवसानिमित्त

सांगवी : नगरसेवक शत्रुघ्न (बापू) काटे यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते पिंपळे सौदागर येथे विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. पिंपळे सौदागर येथील लिनियर गार्डनमध्ये असलेल्या प्लाझा, जॉगिंग ट्रॅकमध्ये विद्युत दिवे कार्यान्वित करण्यात आले. आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच नगरसेवक शत्रुघ्न काटे व नगरसेविका निर्मला कुटे यांच्या पाठपुराव्यानंतर लिनीयर अर्बन गार्डनमध्ये विद्युत दिवे बसविण्यात आले आहेत. या आकर्षक अशा विद्युत रोषणाईमुळे लिनियर गार्डनमध्ये आकर्षकतेमध्ये भर पडली आहे.

याप्रसंगी महापौर नितीन काळजे, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, नगरसेवक शत्रुघ्न काटे, निर्मला कुटे, जयनाथ काटे, चंद्रकांत नखाते, बाबासाहेब त्रिभुवन, नामदेव ढाके, हर्षल ढोरे, सविता खुळे यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते.