लिहा तांडा येथे जंतुनाशक फवारणी

0

जळगाव: सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने उपाययोजना म्हणून गावागावात जंतुनाशक फवारणी करण्यात येत आहे. जामनेर तालुक्यातील लिहा तांडा येथे देखील ग्रामपंचायतच्या वतीने सोडियम हायपक्लोराईड (जंतुनाशक) फवारणी करण्यात आली. पूर्ण गावात प्रत्येक घरापर्यंत जाऊन जंतुनाशक फवारणी करण्यात आली आहे. महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत, ग्रामपंचायत सर्वच आपापल्या परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना करत आहे.