जळगाव । ममुराबाद रस्त्यावरीली लेंडी नाल्याचा नैसर्गिक प्रवाह श्रीश्री इन्फ्रास्ट्रक्चर गृप अँड विजयकुमार जैन व्हेंचर यांनी बदलविल्याची तक्रार अॅड. विजय पाटील यांनी तात्कलीन आयुक्त जीवन सोनवणे यांच्याकडे केली होती. त्यानुसार प्रशासनातर्फे चौकशी करण्यात आली असता मूळ लेआऊटची फाईल नगररचना विभागातून गहाळ झाल्याचे समोर आले होते. दरम्यान, आयुक्तांनी स्वतः नाल्याची पहाणी करून श्रीश्री इन्फ्रास्ट्रक्चर ग्रुप अॅड विजयकुमार व्हेंचरला यांना नोटिस देवून म्हणणे मांडण्यासाठी तीन दिवसांची मुदत दिली होती. यानुसार संबधीतांनी मनपा प्रशासनाकडे कागपदपत्रांची मागणी केली होती. ती फाईल आयुक्तांनी मागणी केली असता ती फाईल गहाळ झाल्याची धक्कादायक बाब समोर आली होती. फाइल गहाळ झाल्याने संबंधीत अधिकार्यांना तीन दिवसांची मुदत देण्यात आली होती. परंतु, त्यांनी दिलेल्या मुदतीत फाइल न शोधल्याने नगररचनाकारांनी तक्रार दिली आहे.