लेखी आश्वासनानंतर २ तासात भाजपाचे आंदोलन मागे

0

अखेर प्रशासन नमले

: तालुक्यातील स्वस्त धान्य वाटप व्यवस्था सुरळीत होऊन तक्रार झालेल्या दुकानदारावर कार्यवाही करुन दुकान रद्द करण्याच्या मागणीसाठी नवापूर भाजपातर्फे भरत गावित यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार कार्यालयाजवळ मंडप पाडुन आंदोलन केले. दरम्यान, लेखी आश्वासन मिळाल्यावर २ तासांनी आंदोलन मागे घेण्यात आले.

नवापुर तालुक्यातील स्वस्त धान्य वाटप व्यवस्था सुरळीत होऊन तक्रार झालेल्या दुकानदारांवर कारवाई करावी. यावर पत्र मिळाल्यापासुन सात दिवसाच्या आत कळविण्यात आले होते.परंतु संबधित विभागाकडुन आजतागायत कार्यवाही झालेली नाही किंवा विभागाकडुन लेखी खुलासा देण्यात आलेला नसल्यामुळे स्वस्त धान्य दुकानदार धान्य वितरण व्यवस्था सुरळीत होऊन तक्रारी असलेल्या दुकानदारांचे परवाना रद्द करण्याच्या मागणीसाठी भाजपा नेते भरत गावित यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.

माजी जि.प.अध्यक्ष भरत गावित, जिल्हा सरचिटणीस राजेंद्र गावीत,जिल्हा चिटणीस एजाज शेख, नगरसेवक महेंद्र दुसाने, शहराध्यक्ष प्रणव सोनार, जयंती अग्रवाल,जाकीर पठाण, माजी नगरसेवक रमला राणा,हेमंत जाधव, समिर दलाल,जितेंद्र अहिरे, दिनेश चौधरी, सपु मिस्ञी,भिमसिंग पाडवी, भाविण राणा व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत सनदशीर मार्गाने उपोषण सुरू करण्यात आले होते.फिजीकल डिस्टन ठेवण्यात आला होता. यानंतर दुपारी २ वाजता तहसीलदार सुनिता ज-हाड यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याशी चर्चा करुन तहसीलदार ज-हाड यांनी १८ स्वस्त धान्य दुकानदारावर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिल्यानंतर भारतीय जनता पार्टीने उपोषण मागे घेतले. तसेच ऑनलाईनच्या डाटाएन्ट्रीची कामे १ महिण्याच्या आत पुर्ण करण्यात येईल, असे आश्वासन तहसीलदार यांनी दिले. यावेळी पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत, पो.का. निजाम पाडवी, प्रशांत यादव आदी उपस्थित होते.कोरोना काळात कुठेही उपोषण तथा आंदोलन नवापूर तालुक्यात झाले नाही. त्यानंतर लाँकडाऊनमध्ये शितलता देण्यात आल्यानंतर रेशन दुकानाबाबत पहिले उपोषण झाले. भाजपातर्फे वारवार निवेदन दिल्यावर ही कारवाई होत नसल्याने उपोषण करण्यात आले.भरत गावित यांनी उपोषणाबाबत सविस्तर माहिती प्रसार माध्यमांना देऊन कुठे कोण चुकत आहे यावर प्रखरपणे विचार मांडले. अवघ्या २ तासात प्रशासनाला लेखी खुलासा देण्यास भाग पाडले.

अनेक तक्रारी
लाँकडाऊनच्या काळात स्वस्त धान्य दुकानाबाबत अनेक तक्रारी होत्या.आमदारांनीही आढावा बैठकीत तहसीलदारांना ही बाब निर्देशनास आणुन दिली होती. त्यावर तहसीलदार व बीडीओ यांनी अचानक रेशन दुकांनावर भेट देऊन काही दुकानावर कारवाई केली होती. त्यानंतर पुन्हा तक्रारी येऊ लागल्या होत्या.