‘लेटलतिफ’ अधिकार्‍यांना मिळाला धडा!

0

पुणे : बैठकीला उशिरा आलेल्या अधिकार्‍यांना धडा शिकविण्यासाठी महापालिका स्थायी समिती बैठकीच्या सभागृहाचे दार अधिकार्‍यांसाठी चक्क बंद करण्यात आले. त्यामुळे अनेक अधिकार्‍यांना दरवाजा उघडेपर्यंत थांबावे लागले. त्यात आरोग्य प्रमुखांसह अनेक वरिष्ठ अधिकार्‍यांचा समावेश होता.

महापालिकेच्या विषय समित्यांना अधिकार्‍यांनी गैरहजर राहणे, उशिरा येणे हे प्रकार नवीन नाहीत. त्यावरुन नगरसेवकांनी आयुक्तांकडे अनेकदा तक्रारीही केल्या आहेत. तर काहींनी थेट आंदोलनेही केली आहेत. या सततच्या प्रकारला वैतागलेल्या स्थायी समिती सदस्यांनी मात्र मंगळवारी थेट अधिकार्‍यांना दरवाजाबाहेरच उभे केले. बैठकीसाठी दुपारी बारा वाजेची वेळ निश्‍चित आहे. मात्र, अध्यक्षांसह सर्व सदस्य येऊनही आयुक्तांसह अनेक खाते प्रमुख बैठकीला उपस्थित नव्हते. नंतर आयुक्त सौरभ राव बैठकीच्या ठिकाणी पोहचले. त्यांनी त्यांच्या कार्यालयात सुनावणी सुरू असल्याचे सांगत बैठकीसाठी उशीर झाल्याचे सांगितले. तसेच दिलगिरीही व्यक्त केली. त्यानंतर दहा ते पंधरा मिनिटानंतर दरवाजाबाहेर उभ्या असलेल्या अधिकार्‍यांना आत घेण्यात आले.