लेवा गणबोलीतील पाच साहित्यिकांच्या पुस्तकांचा 23 रोजी प्रकाशन सोहळा..

0

जळगाव। मासिक ‘लेवाशक्ति’ परिवारातर्फे पाच साहित्यिकांच्या पुस्तकांचा प्रकाशन सोहळा उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.पी.पी.पाटील यांच्याहस्ते दि.23 जुलै रविवार रोजी सायंकाळी 6 वाजता येथील डॉ.जे.जी.पंडित हाऊस(आय.एम.ए.सभागृह)व.वा.वाचनालयासमोर, रेल्वे स्टेशन रोड येथे होणार आहे. अध्यक्षस्थानी आमदार सुरेश(राजूमामा) दामू भोळे असणार आहेत. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे एटीएस प्रमुख डॉ.सुहासराव वारके, महसूल विभाग मंत्रालय मुंबईचे उपसचिव शामसुंदर पाटील, जळगाव पीपल्स को.ऑप.बँकेचे चेअरमन भालचंद्र पाटील, दैनिक ‘जनशक्ति’ व मासिक ‘लेवाशक्ति’चे संपादक तथा सिद्धीविनायक ग्रुपचे चेअरमन कुंदनदादा ढाके, मलकापूर येथील साहित्यिका व समिक्षिका प्राचार्या डॉ.शोभा नाफडे यांची उपस्थिती राहिल. मासिक लेवाशक्तितर्फे सामाजिक तसेच पर्यावरणविषयी तसेच आरोग्याविषयीचे उपक्रम राबविण्यात येतात.

‘लेवा गणबोली’ जिवंत ठेवण्यासाठी साहित्यिकांचा प्रयत्न
यावेळी डोंबिवली येथील लेखक डॉ. नी.रा.पाटील यांच्या श्रीराम बंधु लक्ष्मण यांच्या जीवनावरील प्रदीर्घ कादंबरी ‘प्रतिहार’, भादली येथील लेखक डॉ.अ.कृ.नारखेडे यांच्या लेवा गणबोलातील लेखमिसळ ‘कुचुंम्रा’, मुळचे आसोदा येथील व सध्या डोंबिवलीत वास्तव्यास असलेले ज्येष्ठ साहित्यिक भा.लो.चौधरी यांच्या लेवा गणबोलीतील तीन अंकी नाटकाची द्वितीय आवृत्ती ‘मरी जायझो’, डोंबिवली येथील डॉ.राम नेमाडे ‘राजेश’ यांचे काव्यसंग्रह ‘ऋतुगंध’ व ‘हिरवा चाफा’ तसेच ठाणे येथील ज्येष्ठ लेखिका सौ.लिला प्रभाकर गाजरे यांच्या लेवा गणबोलीतील नाट्यछटा संग्रह ‘लेवांचा मेवा-हालका फुलका’ या पुस्तकांचे प्रकाशन होणार आहे. लेवा गणबोलीत लिखाण करणारे हे साहित्यिक आहेत. लेवा गणबोली जिवंत ठेवण्यासाठी त्यांचे अविरत प्रयत्न सुरु आहेत. या कार्यक्रमाला साहित्यप्रेमी व रसिकांनी मोठ्यासंख्येने उपस्थिती द्यावी असे आवाहन ‘लेवाशक्ति’ परिवारातर्फे करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी 9405057141 यावर संपर्क साधावा असे कळविण्यात आले आहे.