भुसावळ- अ.भा.लेवा पाटीदार युवक महासंघातर्फे समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात येणार आहे. दहावी परीक्षेत 80 टक्क्यांवर तसेच बारावी परीक्षेत 75 तसेच पदवी, पदविका, पदव्युत्तर, अभियांत्रिकी, वैद्यकीय, कृषी, अभियांत्रिकी, बी.लीब., एम.लीब., डी.एड., बी.एड., एम.एड., बी.पी.एड., चित्रकला, क्रीडा, संगीत या क्षेत्रात प्रथम श्रेणी व पी.एचडी., एमपीएससी, युपीएससी अंतिम परीक्षेत उत्तीर्ण तसेच चौथी व सातवी स्कॉलरशीप परीक्षेत गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या गुणपत्रकाची साक्षांकित प्रत 12 जुलैपर्यंत कल्पना रसवंती (शिवाजी कॉम्प्लेक्स, भुसावळ), श्रीकृष्ण ट्रेडर्स (कृउबा समिती कॉम्प्लेक्स, यावल), श्रीराम अॅग्रो (कृषी उत्पन्न बाजार समिती, फैजपूर), हेरंब कलेक्शन (सावदा, ता.रावेर), प्रमोद होले (विद्यानगर, बोदवड), दत्त बुक डेपो (मुक्ताईनगर) येथे जमा करावी, असे आवाहन शहराध्यक्ष देवेंद्र वाणी यांनी एका पत्रकान्वये केले आहे.