लेवा समाजाच्या अधिवेशनात देशभरातून समाजबांधव येणार

0

पाडळसे येथे 33 वर्षानंतर 4 फेब्रुवारी रोजी अधिवेशन

भुसावळ : तब्बल 33 वर्षानंतर लेवा समाजाचे अधिवेशन यावल तालुक्यातील पाडळसे येथे 4 फेब्रुवारी रोजी होत आहे. या अधिवेशनात देशभरातील लेवा समाजाचे लोक एकत्र येणार असून विविध विषयांवर प्रसंगी चर्चा होणार आहे. या अधिवेशनासंदर्भात पाडळसे येथे बैठक घेण्यात आली. भोरगाव लेवा पंचायतीचे कुटुंबनायक रमेश विठू पाटील यांनी मार्गदर्शन केले. समाजातील काही अनिष्ट चालीरीतींना वेळीच आवर घालण्यासाठी या मेळाव्यात मंथन होणार असल्याचे ते म्हणाले. खान्देशासह बुलडाणा, मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, नागपूर आदी भागातील समाजबांधव या मेळाव्यासाठी पाडळसे येथे येणार आहेत. भुसावळ-पाडळसे रस्त्यावरील इसार पेट्रोल पंपाच्या मोकळ्या जागेत हे अधिवेशन होणार आहे.

कुटुंबनायकाचा होणार सन्मान
भोरगाव लेवा पंचायतीची कुटुंब नायक म्हणून धुरा तब्बल 51 वर्षांपासून अखंडपणे सांभाळणार्‍या रमेश विठू पाटील यांचा सहृदय सन्मान या अधिवेशनात मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.