लेवा समाजात प्रबोधन ; भुसावळातील महाजन परीवाराचा परंपराना फाटा

0

भुसावळ- लेवा पाटील उर्फ पाटीदार समाजात विविध प्रथा आणि परंपरा आहे परंतु काळानुरूप काही प्रथा बंद करणे किंवा त्यात बदल केला पाहिजे, अशा भूमिका लेवा समाजाची नेहमीच राहिली आहे. या समाजात एखाद्या कुटुंबात कोणी मयत झाल्यास मयताच्या उत्तर कार्यानंतर त्या परीवारातील महिलांना साळी चोळी आणि पुरुषांना कपडे घेण्याची प्रथा आहे मात्र शहरातील महाजन परीवारातील सदस्य व राम मंदिर वॉर्डातील महाजन वाड्यातील हभप व आळंदी येथील खानदेश मठाचे माजी संचालक रामभाऊ हरी महाजन यांना 5 रोजी देवाज्ञा झाल्यानंतर भाऊबंदकीत पुन्हा एकाचा मृत्यू झाल्यानंतर उत्तरकार्य 25 रोजी पार पडले. या कालावधीत प्रबोधनात्मक कीर्तन आयोजित करण्यात आले. 25 रोजी सकाळी कीर्तनानंतर माईकद्वारे परीवारातील ज्येष्ठ सदस्याने लगेच या परीवारातील महिलांना साडी-चोळी तसेच पुरुषांना कोणीही कपडे आणू नये, असा निर्णय परीवारासह नातेवाईकांनी घेतला. ही प्रथा समाजात आजपासून बंद केली जावी, असे आवाहनही प्रसंगी करण्यात आले.

जुन्या परंपरेला दिली तिलांजली
कुणीही ही प्रथा पाळू नये, अशी सूचना करण्यात आली. साडीचोळी कार्यक्रम प्रसंगी करण्यात येणार्‍या शिर्‍याचे व्यंजन मंगळवारी उत्तरकार्यात देण्यात येउन जुन्या परंपरेला तिलांजली देण्यात आली. स्व.रामभाऊ (रामदास) हरी महाजन यांचे संपूर्ण जीवन त्यागात गेले. त्यांनी स्वतःच्या विधवा सुनेचा पुर्नविवा करून तिची सख्ख्या मुलीप्रमाणे बिदाई करून समाजात आदर्श घालून दिला. आळंदी येथे वारकर्‍यांच्या सेवेसाठी मठ नियोजन व व्यवस्थापन करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांच्या उत्तर कार्याला त्यांचा मुलगा दिलीप व सून संगीताने चांगला निर्णय घेऊन त्यांना खर्‍या अर्थाने आदरांजली वाहिली.