जळगाव । जगात मॅरेथॉन स्पर्धा होत असतात मात्र त्यापैकी काही अतिशय आवाहनात्मक असतात, अशा समुद्रसपाटी पासून 18 हजार 700 फूट उंची वर हिमालयीन लेह-लदाख मॅरेथॉनचे आव्हान जळगावचा सुपत्रांनी स्वीकारून पूर्ण केली. जळगाव रनर्स ग्रुपचे सदस्य व प्रसिद्ध अभियंता मिलिंद राठी व राष्ट्रीय बॅडमिंटन खेळाळू डॉ.तुषार उपाध्ये यांनी 21 की.मी ची हॉफ मॅरेथॉन यशस्वीरित्या पूर्ण केली. लेह-लदाख मॅरेथॉनचे हे सहावे वर्ष होते. 7 की.मी., 21 की.मी., 42 की.मी. व 72 की.मी या प्रकारात या स्पर्धा होत असतात. या स्पर्धेत ठीक ठिकाणाहुन 5 हजार स्पर्धक झाले होते. त्यात मिलिंद राठी आणि डॉ. तुषार उपाध्ये यांनी 21की. मी. 3 तास 10मिनिटात पूर्ण केली.
आम्ही पहिल्यांदा मॅरेथॉन धावलो
पहिल्यांदाच लेह लदाख गेलो आणि तिथला मॅरेथॉनचे वातावरण पाहून आपणही यात धावाचे असे ठरवले व मी माझे सरकारी मित्र मयूर ढाके ,चंद्रकांत चौधरी, मकरंद कुलकर्णी यांच्या सह 7 की.मी.ची रन पूर्ण केली, असे सुप्रसिद्ध होमिओपॅथिक तज्ञ डॉ.जे.एच.तळेले यांनी सांगितले. जळगावात या रनर्स ग्रुप मूळे रनिंग कल्चर वाढत आहे ही आनंदाची बाब आहे त्यामुळे जळगाव जिल्ह्याचे नावं सर्व दूर पोहचत आहे.