लैंगिक अत्याचाराच्या निषेर्धात राष्ट्रवादीचे आंदोलन

0

पिंपरी : संत तुकाराम सहकारी साखर कारखाना, कासारसाई येथे ऊसतोड कामगारांच्या अल्पवयीन मुलींवर झालेल्या बलात्काराच्या निषेधार्थ आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी-चिंचवड शहर महिला विभागाच्यावतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात आंदोलन करण्यात आले.

यावेळी शहराध्यक्षा वैशाली काळभोर व शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले. आंदोलन करण्यात आले. यावर सर्व महिला कार्यकर्त्यांनी घोषणा देवून झालेल्या घटनेचा निषेध करून आरोपींना शिक्षा व्हावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी संजोग वाघेरे पाटील, महिला अध्यक्षा वैशाली काळभोर, पक्ष प्रवक्ते फजल शेख, कविता खराडे, पुष्पा शेळके, मनिषा गटकळ, दिपाली देशमुख, पौर्णिमा पालेकर, शिल्पा बिडकर, आशा शिंदे, शमा कोरबू, मिना कोरडे, सुप्रिया पवार , सविता धुमाळ, मंगल ढगे, निर्मला माने, विजया काटे, बाळासाहेब पिल्लेवार, सर्जेराव जगताप, यतिन
पारेख, रंजना कराळे, हमीद शेख, विजय दळवी आदी उपस्थित होते.