नवी दिल्ली – करोनाचा व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशभर सुरु असलेल्या लॉकडाउनमुळे सर्वांना २४ तास घरातच राहावे लागत असल्याने घरातील कुरबुरी वाढल्या आहेत. लॉकडाउन सुरू झाल्यानंतर देशभरात कौटुंबिक हिंसाचाराच्या तक्रारी वाढल्या असल्याचर राष्ट्रीय महिला आयोगाने दिली आहे.
राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी याविषयी माहिती दिली. शर्मा म्हणाल्या, ‘महिला आयोगाकडे सध्या ई-मेल द्वारे जास्त तक्रारी येत आहेत. मार्चच्या पहिल्या आठवड्यात (२ ते ८ मार्च) आयोगाकडे देशभरातून महिला हिंसाचाराच्या ११६ तक्रारी आल्या होत्या. त्यानंतर लॉकडाउनच्या कालावधीत हा आकडा दुपटीने वाढला आहे. पहिल्या दिवसांशी तुलना केल्यास (२३ ते ३१ मार्च) लॉकडाउनच्या कालावधीतील दहा दिवसात २५७ तक्रारी आयोगाकडे दाखल झाल्या आहेत,’ अशी माहिती शर्मा यांनी दिली. गेल्या दहा दिवसात कौटुंबिक हिंसाचाराच्या सर्वाधिक तक्रारी उत्तर प्रदेशातून आल्या आहेत. ९० तक्रारी महिला आयोगाला प्राप्त झाल्या आहेत. त्यापाठोपाठ दिल्ली ३७, बिहार १८, महाराष्ट्र १८, मध्य प्रदेश ११ अशा तक्रारी आल्या आहेत. लॉकडाउन होण्याआधीच्या काळात उत्तर प्रदेश ३६, दिल्ली १६, बिहार ८, मध्य प्रदेश ४ आणि महाराष्ट्रातून ५ तक्रारी दाखल करण्यात आल्या होता.
Prev Post