लॉकडाऊनमध्ये देखील ‘पीएमपी’ची अविरत प्रवासी सेवा

0

पुणे : संचारबंदी लागु झाल्यानंतर पुणे महानगर परिवहन महामंडळा (पीएमपी) कडून दररोज अत्यावश्यक सेवेतील अधिकारी व कर्मचाजयांसाठी बससेवा पुरविली जात आहे. दररोज सुमारे साडे नऊ ते दहा हजार जणांची ने-आण केली जात आहे. यात ससून, नायडू, वायसीएम या रुग्णालयांसह खासगी रुग्णालये, अत्यावश्यक सेवेतील शासकीय व निमशासकीय अधिकारी-कर्मचारी, खासगी कंपन्यांमधील कर्मचार्‍यांचाही त्यामध्ये समावेश आहे.

अत्यावश्यक सेवेतील अधिकारी व कर्मचार्‍यांसाठी पुणे व पिंपरी चिंचवडमधील ५० हून अधिक मार्गांवर दर तासाला या बस सोडल्या जात आहेत. तेरा आगारांमार्फत हे नियोजन करण्यात आले आहे. दिवसभरात या बसमधून सुमारे साडे नऊ ते दहा हजार प्रवासी प्रवास करत आहेत. दिवसभराचे संचलन पुर्ण झाल्यानंतर सर्व बस रात्रीच्यावेळी संबंधित आगारामध्ये स्वच्छ केल्या जातात. त्यानंतरच या बस दुसजया दिवशी मार्गावर पाठविल्या जात आहेत. तसेच मागणीनुसार ससून, नायडू रुग्णालय तसेच पोलिसांनाही संशयित रुग्ण किंवा घरी पाठविण्यात येणाजया रुग्णांची ने-आण करण्यासाठी बस उपलब्ध करून दिल्या जात आहेत.