लॉकडाऊनमध्ये नुकसान झाल्याने गाळे धारकांचे भाडे माफ करा

0

राष्ट्रवादी युवक काँगे्रसतर्फे यावल कृउबा सचिवांना निवेदन

यावल : कोविड 19 च्या प्रादुर्भावामुळे बाजार समिती सचिवांसह नगरपालिका प्रशासनाला राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे निवेदन देण्यात आले तसेच गाळेधारकांचे लॉकडाऊनमुळे नुकसान झाल्याने भाडे माफ करण्याची मागणी करण्यात आली.

तीन महिन्यांचे भाडे करावे माफ
कृउबा तसेच यावल पालिकेच्या मालकीचे शहरात शॉपींग संकुल असून तीन महिन्यांपासून व्यवसाय बंद असल्याने दुकानदारांचे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याने गाळे धारकांना तीन महिन्यांचे भाडे माफ करावे, अशी मागणी करण्यात आली. निवेदनावर राष्ट्रवादी युवक अध्यक्ष अ‍ॅड.देवकांत पाटील, प्रा.मुकेश येवले, अन्वर खाटीक, विजय पाटील, एम.बी.तडवी, किशोर माळी, गणी खान, आयुब सर, कामराज घारू, अरुण लोखंडे, हेमंत येवले, राकेश सोनार आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत. दरम्यान, कृउबा सचिवांसह खरेदी विक्री संघ, नगरपालिका, फळ विक्री संघ फ्रुट सेल यांनाही निवेदन देण्यात आले असून तसेच सहकार मंत्री, अर्थ मंत्री, मुख्यमंत्री यांनाही मेल आयडीवर निवेदन पाठवण्यात आले असल्याचे अ‍ॅड.देवकांत पाटील यांनी सांगितले.