नंदुरबार। भारत लॉकडाऊनच्या काळात बंदी असतांना नवापूर शहरात मद्य विक्री बेकायदेशीर दारूची वाहतूक आणि विक्री सुरू असल्याचा प्रकार समोर आला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने दारू वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई केली असून 3 लाख 6 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नवापूर शहरात दारू विक्री होण्याबरोबरच नजीकच्या गुजरात राज्यात वाहतूक सुरू असल्याचे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने केलेल्या कारवाईतुन स्पष्ट दिसत आहे. जुना आरटीओ नाक्यावर टोयोटो या वाहनातून साहूल बालू गावित हा तरुण विना परवाना देशी दारूची वाहतूक करतांना पकडला गेला. तर दुसऱ्या एका कारवाईत नवापूर शहरातच विनोद भगवानदास गोलकानी हा दारु विक्री करतांना आढळून आला आहे. या दोन्ही कारवाईत एकूण 3 लाख 6 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.