मुंबई – लॉकडाऊनचा भंग करणार्याविरुध्द राज्यभरात पोलिसांनी रविवारपर्यंत ५५,३९३ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून ११,६४५ जणांना अटक करण्यात आली आहे. राज्यात लॉकडाउनचा भंग करण्यात पुणेकर सर्वात आघाडीवर आहे. केवळ पुणे शहरात ८,१०० जणांवर गुन्हे नोंदविण्यात आले असून त्यापाठोपाठ अहमदनगरमधील गुन्ह्यांची संख्या ५,३८२ एवढी आहे. मुंबईतील गुन्ह्यांची संख्या ४,११५ एवढी झाली असून, पिंपरी-चिंचवडमधील गुन्ह्यांची नोंद ४,६८८ पर्यंत गेली आहे. सोलापूरमध्ये ३,५५१, नागपूरमध्ये ३,२४७, कोल्हापूरमध्ये २,८५२, ठाण्यात १,३०३ एवढी गुन्हे नोंदविले गेले आहेत.
कोरोनाचा फैलाव रोखणण्यासाठी देशात ३ मे पयर्र्ंत लॉकडाऊन करणण्यात आले आहे मात्र याचे पालन करण्याऐवजी ते मोडणार्यांची संख्या दिवसेेंदिवस वाढत आहे. परिणामी कोरोना बाधितांची संख्याही वाढत आहे. लॉकडाउनमध्ये लोकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये म्हणून पोलिस प्रयत्न करत असताना अनेकांकडून त्यास हरताळ फासला जात आहे. त्यामुळे पोलिसांकडूनही कारवाईची तीव्रता वाढविली जात आहे. वेगवेगेळ्या कारवाईत जप्त केलेल्या मालमत्तेची रक्कम २ कोटी रुपयांवर पोहोचली आहे.