पहूर- जामनेर तालुक्यातील लोंढ्री बुद्रूक शेतकरी विठ्ठल तुकाराम शेळके (42) यांनी गुरुवारी सकाळी पावणे अकराच्या सुमारास विषारी द्रव सेवन करून आत्महत्या केली. शेळके हे अल्पभूधारक शेतकरी होते. पत्नीसह ते गुरुवारी सकाळी बटाईने केलेल्या मोतीआई परीसरातील शेतात गेले असता पत्नीसमोर त्यांनी विषारी द्रव प्राशन करीत दुचाकीने घर गाठले व घरीदेखील त्यांनी विषारी द्रव सेवन केले. त्यांच्या पाठीमागून पत्नी घरी पोहोचल्यानंतर पुढील उपचारासाठी शेळके यांना जळगाव जिल्हा सामान्य रूग्णालयात नेत असताना पाळधीजवळ त्यांची प्राणज्योत मालवली. पहूर येथे शवविच्छेदन करून गुरुवारी दुपारी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा, आई असा परीवार आहे. प्रकाश रामदास कोलते यांच्या खबरवरून पहूर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.