बारामती । बारामती येथील अतिरिक्त जिल्हान्यायालयात झालेल्या लोकअदालत न्यायालयात 142 खटले निकाली काढण्यात आले. अतिरिक्त जिल्हा न्यायाधिश आर. जी. देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे लोकन्यायालय पार पडले. बारामती वकील संघटनेचे अध्यक्ष अॅड. विजयसिंग मोरे व त्यांच्या सहकारी वकीलांनी सात पॅनलवर काम पाहीले. अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश राठी, अवट कोर्ट, एन. बी. शिंदे, ए. एम. राजकारणे तसेच जिल्हा न्यायाधीश व अनेक प्रथम वर्ग न्यायाधीश यांनी या लोकन्यायालयात सहभाग घेतला.
91 लाखांची नुकसान भरपाई
मोटार अपघातासह इतर खटल्यात एकूण 91 लाख 33 हजार 494 रुपये नुकसान भरपाई यावेळी पक्षकारांना देण्याच्या तडजोडी करण्यात आल्या. एम. एस. सी. बी., बी. एस. एन. एल व बँका यावर खटल्यांची तडजोड झाली. यामध्ये 13 लाख 20 हजार रुपयांची भरपाई करण्यात आली. लोकन्यायालय यशस्वी करण्यासाठी अतिरिक्त जिल्हा न्यायाधिश आर. जी. देशपांडे व त्यांचे सहकारी न्यायाधिश व वकील संघटना व वकीलांनी विशेष परिश्रम घेतले.