लोकमानसातुन मिळालेल्या पदवीस महत्व : नाना नवले

0

ढोरे यांच्या सत्कार कार्यक्रमात व्यक्त केले मत

नवी सांगवी : सुदाम ढोरे यांनी काँग्रेस पक्षाची सेवा केली, पण त्यांना कुठलेही राजकीय पद मिळाले नाही. राजकारणात संधी मिळाली नसली तरी सामान्य माणसांमध्ये त्यांना मिळालेले नेते ही उपाधी कुठल्याही राजकीय पदापेक्षा मोठी आहे. ते कायम नेते म्हणूनच राहणार आहेत, असे गौरवोद्गार माजी खासदार नाना नवले येथील काढले. जेष्ठ समाजसेवक व जुने काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते सुदाम रघुनाथ ढोरे यांचा पंचाहत्तराव्या वाढदिवसाचा व जाहीर सत्कार समारंभाचे आयोजन शेवाळे गार्डन येथे करण्यात आले होते. ढोरे यांचा सत्कार करताना नाना नवले बोलत होते.

या कार्यक्रमाचे संयोजन सांगवीतील नगरसेवक हर्षल ढोरे यांनी केले होते. यावेळी माजी खासदार अशोक मोहोळ, माजी महापौर रंगनाथ फुगे, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष संजोग वाघेरे, काँग्रेस शहर अध्यक्ष सचिन साठे, नगरसेवक भाऊसाहेब भोईर, नगरसेविका माई ढोरे, विष्णु नेवाळे, शाम अग्रवाल, मनोहर पवार, सतिश दरेकर, सतिश म्हस्के, ज्ञानेश्‍वर तापकीर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाष ढोरे यांनी व नाना शिवले यांनी आभार मानले.