वाघोली । वाघोली येथील बायफ रोडच्या उभारणीसाठी लोकवर्गणी व शासकीय निधीच्या माध्यमातून हातभार लावून या रस्त्याचे काम मार्गी लावण्यात आले आहे. त्यामुळे या रस्त्याला लागून असणार्या अनेक गृहनिर्माण सहकारी संस्थेत राहणार्या नागरिकांसाठी बायफ रोड वरदान ठरला आहे.
माजी जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ दाभाडे, माजी पंचायत समिती सभापती वसुंधरा उबाळे, माजी सरपंच शिवदास उबाळे, उपसरपंच समीर भाडळे, पूजा भाडळे, महेंद्र भाडळे, ग्रामपंचायतीचे कार्यकारी मंडळ, स्थानिक नागरिक यांनी विशेष पुढाकार घेऊन लोकवर्गणी व शासकीय निधी आदींच्या माध्यमातून हातभार लावला आहे. या रस्त्याला लागून असणार्या अनेक गृहनिर्माण सहकारी संस्थेत राहणार्या नागरिकांसाठी बायफ रोड वरदान ठरला आहे. शिवदास उबाळे, वसुंधरा उबाळे, समीर भाडळे, पूजा भाडळे, महेंद्र भाडळे यांनी या रस्त्यासाठी पथदिवे, ठिकठिकाणी गतिरोधक बसवून सामाजिक बांधीलकी जोपासली आहे. यात सुयोग नगर, भाडळे वस्ती, अनुसया पार्क, आनंद नगर, सरकारी दवाखान्याच्या मागील बाजूस पथदिवे बसवण्यात आले आहेत. सामाजिक जाणीव ठेवून करण्यात आलेल्या विकासकामामुळे उबाळे आणि भाडळे यांचा समाजातील सर्व स्थरातून कौतुक होत आहे.