लोकवस्तीतून दारुची दुकाने हद्दपार

0

यवत । लोकवस्तीत यापुढे दारुच्या दुकानांना परवानगी मिळणार नाही. तसा ठरावच स्वातंत्र्यदिनी यवतमध्ये झालेल्या ग्रामसभेत करण्यात आला आहे. सरपंच रजिया तांबोळी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रामसभेस महसूल, शिक्षण पोलिस, आरोग्य अशा विविध विभागांचे प्रतिनिधी व ग्रामस्थ उपस्थित होते.

स्वातंत्र्यदिनी शाळेत होणार्‍या राष्ट्रीय कार्यक्रमात ग्रामसभा उरकण्याचा मागील अनेक वर्षांचा प्रघात यावेळी मोडण्यात आला. स्वातंत्र्य दिनाचे कार्यक्रम झाल्यानंतर ग्रामसभा ग्रामसभा घेण्यात आली. त्यात विविध ठराव मांडण्यात आले. दारुच्या दुकानांना यापुढे लोकवस्तीत परवानगी देऊ नये, असा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. स्वागत कमान बांधण्याबाबत राजकारण होत असल्याचे मत माजी उपसरपंच सुभाष यादव यांनी मांडले. या कमानीच्या कामात दलित समाजाचा नसल्याचे भारतीय रिपब्लिकन पक्षाचे (भारिप) तालुकाध्यक्ष उत्तम गायकवाड यांनी स्पष्ट केले. शाळेच्या उत्तर बाजूकडील प्रवेशद्वार केवळ पालखीसाठ उघडावे. शाळेभोवतालच्या दुकानातील खाऊची विहित तपासणी केली जावी, अशी मागणी अनिल गायकवाड यांनी केली. सविता पवार यांनी दारू दुकाने यापुढे लोकवस्तात होणार नाहीत, असा प्रयत्न व्हावा असे मत मांडले. साखर कारखान्याच्या प्रदूषणाचा वाढता त्रास थांबवावा, असे मत सुभाष यादव यांनी मांडले. कुक्कुटपालन व गुर्‍हाळे यांच्यामुळे होणार्‍या प्रदूषणास अटकाव करावा, असे मत मनोज कांबळे यांनी मांडले. रोडरोमिओंवर कारवाई करावी, अशी मागणी गणेश दोरणे यांनी केली या विविध विषयांचे ठराव ग्रामसभेत मंजूर करण्यात आश्‍वासन ग्रामपंचायत प्रशासनाकडून देण्यात आले. स्थावर मालमत्तेचे, सातबाराचे ऑनलाइन संकलन पूर्ण होत आले आहे. त्यातील आक्षेप व दुरूस्त्यांबाबत होत असलेल्या चावडी वाचनास प्रतिसाद मिळत नसल्याची खंत मंडल अधिकारी दुर्गादास शेळकंदे यांनी व्यक्त केली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य गणेश कदम, डॉ. अशोक रासगे, ग्रामविकास अधिकारी सयाजी क्षीरसाागर, उपसरपंच समीर दोरगे, सुभाष यादव, सदानंद दोरगे, रमेश यादव, महिला