भुसावळ । लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त शहरातील विविध संस्था, संघटनांतर्फे अभिवादन करण्यात आले. क्रांतीविर लहुजी साळवे मातंग संस्थेतर्फे प्रतिमा पुजनाचा कार्यक्रम पार पडला. अध्यक्ष अशोक पारधे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. यावेळी सचिव लखन पारधे, शंकर चव्हाण, मातंग समाज तालुकाध्यक्ष अरुण खडसे, शहराध्यक्ष भारत गोफणे, ऋषिकेश रोटे, विनोद दाभाडे, देविदास गालफाडे, भिका सकट, राम भालेराव यांची उपस्थिती होती.
महिला संस्थेतर्फे झाला कार्यक्रम
मातंग समाज महिला संस्थेतर्फे अभिवादनाचा कार्यक्रम घेण्यात आला. अध्यक्ष लता पारधे यांनी प्रतिमा पूजन केले. यावेळी गिता चव्हाण, उषा चव्हाण, सुनिता भिसे, मोहिनी ठोकळ, दिव्या पारधे, शुभांगी पारधे, शोभा क्षिरसागर यांची उपस्थिती होती.