नंदुरबार । भारतातील गौरवशाली राज्यव्यवस्थेने राजा श्रीरामापासून राजा छत्रपती शिवारायांपर्यंतचे अनेक आदर्श दिले. असे असतांना स्वातंत्र्यानंतर मात्र ब्रिटिश पध्दतीची राज्यव्यवस्था येथील राज्यकर्त्यांनी स्विकारली. परिणामी भारताची मागील 70 वर्षात दयनीय अवस्था बनली असून आज सर्वत्र भ्रष्टाचार, अनाचार, अत्याचार, वाढती गुन्हेगारी आणि हक्क-आरक्षण हेच पहायला मिळत आहे. पूर्वीच्या राज्यव्यवस्थेमध्ये आधी शिक्षण मग गुरुदक्षिणा असायची. परंतु आधी डोनेशन मग अॅडमीशन त्यानंतर एज्यूकेशन अशी पध्दत स्विकारल्यापासून देशाची अधोगतीकडे वेगाने वाटचाल चालू आहे.
लोकशाहीतील दुष्प्रवृत्तींविरोधातील अभियान : यात सकाळी प्रारंभी परमपूज्य भक्तराज महाराज यांच्या प्रतिमेचे विधीवत पूजन प्रा.डॉ.सतिष बागूल यांच्या हस्ते सपत्निक करण्यात आले. सौरभ पंडित यांनी पौराहित्य केले. यानंतर बाळाजी आठवले यांनी सांगितलेल्या व्यष्टी आणि समष्टी साधनेची माहिती देणारे प्रवचन निवेदिता जोशी यांनी केले. तदनंतर सायंकाळी झालेल्या सभेत लोकशाहीतील दुष्प्रवृत्तींविरोधातील अभियानाविषयी माहिती देतांना डॉ.नरेंद्र पाटील यांनी सांगितले की, समितीने या अभियानांतर्गत भ्रष्ट अधिकार्यांना निलंबीत करण्याची तसेच काही मंदिर संस्थांच्या भ्रष्टाचाराविरुध्दची कारवाई घडवली असून आता साध्वी प्रज्ञासिंहांसारख्या हिंदुत्वप्रेमींचा छळ करणार्यांविरुध्द कारवाई व्हावी म्हणून स्वाक्षरी मोेहिम आणि आंदोलन सुरु करणार आहे.
गुरुशिष्याची आदर्श परंपरा : प्रमुख वक्ते भोणे येथील ह.भ.प.रामकृष्ण महाराज यांनी गुरुशिष्याची आदर्श परंपरा सांगतांनाच महिलांनी धर्मआचरणाचे संस्कार मुलांवर करणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केले. हिंदुंनी शौर्य जागरण करण्याची आवश्यकता या विषयावर मार्गदर्शन करतांना धुळ्याचे पंकज बागूल यांनी सांगितले की, मुठभर दुष्प्रवृत्तींमुळे सारा समाज असुरक्षीत बनला असून केव्हा कोणत्या अत्याचाराला सामोरे जावे लागेल सांगता येत नाही, असेही बागूल म्हणाले. सकाळच्या सत्रात प्रियंका पाटील हिने तर सायंकाळच्या सत्रात सौरभ पंडित यांनी सूत्रसंचालन केले. भावना कदम, आकाश गावित, जय पंडित, उमा कदम, राहूल चौधरी यांनी स्वसंरक्षणविषयक प्रात्यक्षिके याप्रसंगी सादर केली.
आदर्श राज्य व्यवस्था असावी
ही स्थिती पालटण्यासाठी लोकशाहीतील दुष्प्रवृत्तींचे निर्मूलन करणार्या व आदर्श राज्य व्यवस्था असलेल्या हिंदु राष्ट्राची स्थापना करावी लागेल. आज गुरुपौर्णिमेनिमित्त यासाठी सर्वांनी कटीबध्द होऊ या, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे डॉ.नरेंद्र पाटील यांनी केले.नंदुरबार येथील ब्राह्मणवाडीतील सभागृहात दि.9 जुलै रोजी सायंकाळी 6 वाजता सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती आयोजित गुरु पौर्णिमा महोत्सवात ते बोलत होते. अत्यंत भावपूर्ण झालेल्या या महोत्सवात सकाळच्या सत्रात गुरुपूजन व साधनेचे महत्व या विषयावरील प्रवचन झाले तर सायंकाळच्या सत्रात विविध विषयांवर मान्यवरांचे मार्गदर्शनपर विचार मांडण्यात झाले.