मुंबई- मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी अशिक्षित, अडाणी अशा शब्दांचा वापर करून नव्या वादाला तोंड फोडले आहे. मात्र, निरूपम आपल्या विधानावर ठाम आहेत आणि आपल्या विधानात काहीही चुकीचे नसल्याचे त्यांनी ठामपणे म्हटले आहे. आपण लोकशाहीत राहतो आणि लोकशाहीत पंतप्रधान हा देव नसतो. लोकशाहीत पंतप्रधानांवर टीका ही होत असतेच, मर्यादेत राहून टीका करण्यात काहीच चुकीचं नाही. मी वापरलेले शब्द असभ्य नव्हते, मी माझ्या विधानावर ठाम आहे से निरुपम म्हणाले.
भाजपावाले गरजेपेक्षा जास्त संवेदनशील झाले आहेत. प्रत्येक विधानावर त्यांचा आक्षेप असतो. पहिली गोष्ट म्हणजे नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत आणि आपण लोकशाहीत राहतो. लोकशाहीमध्ये पंतप्रधानांवर टीका ही होत असतेच, मर्यादेत राहून टीका करण्यात काहीच चुकीचं नाही. मी वापरलेले शब्द अजिबात चुकीचे नव्हते. मी माझ्या विधानावर ठाम आहे, असे निरूपम म्हणाले.