जळगाव प्रतिनिधी । येथील जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी जिल्हाधिकारी किशोर राजेनिंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली लोकशाही दिन झाला. यात १२६ तक्रारी अर्ज दाखल झाले.
या वेळी अपर पोलिस अधीक्षक लोहित मतानी, अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके, उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन सांगळे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील, जिल्हा उपनिबंधक विशाल जाधवर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे, महावितरणचे अधीक्षक अभियंता भालशंकर, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, चिटणीस मंदार कुलकर्णी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी बी.ए. बोटे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी रमेश काटकर, समाज कल्याण अधिकारी योगेश पाटील यांच्यासह विविध शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते. या दिनी दाखल झालेल्या तक्रारीनंतर जिल्हाधिकारी निंबाळकर यांनी आढावा बैठक घेत तक्रारींचे निराकरण करण्याचे निर्देश दिले.