लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी; शहरातून काढली मिरवणुक

0

जळगाव । लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती निमित्ताने गुरूनानक नगर, शनिपेठ मधून रथामध्ये अण्णाभाऊसाठेंची प्रतिमा ठेवून भव्य मिरवणूक काढण्यात आली. दलित नेते शिवचरण ढंढोरे यांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला माल्यार्पण, व पीआय प्रविण वाडीले यांच्या हस्ते पूजन करण्यात आले, ढोल-ताशे व लेझीमपथकाने मिरवणूकीला सुरूवात करण्यात आली. संत शिरोमणी श्री नरहरी महाराज जयंती मिरवणुकीमध्ये महाराजांच्या प्रतिमेलाही शिवचरण ढंढोरे यांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे मिरवणुकीतर्फे माल्यार्पण करण्यात आले.

मिरवणुकीत यांचा होता सहभाग
स्वातंत्र्य सेनानी सुभाषचंद्र बोस यांच्या तसेच झाशीची राणी लक्ष्मीबाई पुतळ्याला माल्यार्पण करण्यात आले. नेरी नाक्याजवळ अण्णाभाऊ साठे यांच्या अर्धकृती पुतळ्याला माल्यार्पण करून मिरवणुकीची सांगता करण्यात आली. प्रमुख पाहुणे उपनिरीक्षक बेंद्रे, संदीप ढंढोरे, संतोष खरात, फकीरा बोदडे, बंन्सी डाबोरे, सोमा अंभोरे, दिगंबर खरात, अनुप ढंढोरे, विलास लोट, राजु डाबोरे, सुभाष बोदडे, सुभाष सपकाळे, बापु मोरे, आलीम शेख, विलास तायडे, सुरेश जयराज, रतन कंखरे, हरीष ढंढोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच शंकर अंभोरे, बंटी खरात, अजय ढंढोरे, सागर अंभोरे, मनोज बोदडे, चेतन मोरे, रवि कांबळे, संदीप सपकाळे, कपील मोरे, शारूख बिर्‍हाडे, रोहीत बेंडवाल, हर्षल ढंढोरे, दिनेश जयराज, संजु दरडेकर, नाना सपकाळे, गोपाल पवार, भोपु अठवाल, कैलास सोनवणे, शांताराम अहीरे, गणू तंबोली आदींनी परिश्रम घेतले.

शिवसंग्राम सामाजिक संस्था
जळगाव। येथील शिवसंग्राम संस्थेतर्फे अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा बसविण्याकामी योगदान देणारे ज्येष्ठ समाजसेवक नानासाहेब साठे, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष मो. सईद जहागीरदार, अ‍ॅड. जी. वाय. पाटील, गुणवंत राजहंस, मनोज पोकळे, मातंग समाजाचे ज्येष्ठ कार्यकर्ते नाना थोरात, डि. झेड. मोरे, अशोक पारधे, अनिल साठे व कार्यकर्ते यांच्यातर्फे पुष्पहार अर्पण करून मानवंदना करण्यात आली.