लोकसभा निवडणुकीपूर्वी मेहुल चोक्सीला भारतात आणण्याची शक्यता

0

नवी दिल्ली- पंजाब नॅशनल बँकेला कोट्यावधींचा चुना लावून परदेशात फरार झालेला मास्टरमाइंड मेहर चोक्सीला २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या अगोदर भारतात आणण्याची शक्यता आहे. सध्या मेहुल चोक्सी एंटीगुआ आणि बरमुडा येथे वास्तव्यास आहे. त्याचे भारतात प्रत्यार्पण करण्याची हालचाल सुरु आहे. निवडणुकीआधी त्याला भारतात आणले जाणार असल्याचे बोलले जात आहे.

सर्वप्रथम या प्रकरणी १४ नोव्हेंबर रोजी उच्च न्यायालयात न्या.रिता जोसेफ ओलिवेट्टी यांच्या खंडपीठासमोर हजर करण्यात आले होते. त्यानंतर १२ डिसेंबर रोजी याप्रकरणी सुनावणी झाली. आता २२ जानेवारी २०१९ रोजी सुनावणी होणार असल्याचे सांगितले जात आहे.