लोकसहभागातून धरणाचे काम ; प्रांताधिकार्‍यांनी केले नागरिकांचे कौतुक

0

निजामपूर। येथे 8 महिन्यांपूर्वी धरण फुटले होते. हे धरण लोकसहभाग व श्रमदानातून ह्याच वर्षी बांधण्यात येत आहे. जिल्ह्यात नाही तर राज्यात सुद्धा अशी घटना घडलेली नाही. गावकर्‍यांचा उत्साह व यंत्रसामुग्री पाहून प्रांताधिकार्‍यांनी कामाचे कौतुकही केले. 20 मेे ला सुरू झालेले काम 2 जूनपर्यंत 3350 ट्रॉलीच्या सहाय्याने माती-भराव केला. या सर्व कार्यासाठी यंत्रसामुग्री अहोरात्र काम करून आहे आणि अवघ्या 13 दिवसातच धरणाचे काम 70 टक्के पूर्ण झाले आहे. प्रांताधिकार्‍यांनी 5100 रूपयांची देणगी दिली व कटर मशिन वा पोकलेनची तात्काळ उपलब्ध करून देऊ, असे आश्‍वासनही दिले.

देशबंधू व मंजू गुप्ता फाऊंउेशनतर्फे धरणाला लागणार्‍या दगडी पिचींगचा खर्च उचलणार आहे, असे श्री. रावत व काकडे यांनी सांगितले. त्यांच्यासोबत साक्री तहसिलदार संदीप भोसले, वनविभागाचे अधि. पटवर्धन, पं.स.चे लघु सि.विभागाचे अभियंता खैरनार यांनी विभागातर्फे 30000 रू मदत दिली. ए.सी.पाटील, निजामपूर पो.स्टे.एपीआय अर्जुन पटले, सरपंच प्रतिनिधी पराग माळी, उपसंरपच नामदेव गवळे, धनराज गवळे, मधुकर वाघ, कन्हैलाल काळे, महेद्र हेमाडे, पांडुरंग महाले,कांतिलाल वंजारी, व,ग्रामस्थ उपस्थित होते.