हरतील धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनी संचलित लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालयाच्या प्राचार्य पदी नुकतीच डॉ.राकेश पितांबर चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
डॉ. राकेश पितांबर चौधरी हे याच समाजकार्य महाविद्यालयात गेल्या २१ वर्षांपासून कार्यरत आहे, राकेश चौधरी हे असोसिएट प्रोफेसर म्हणून काम पाहत आहेत. तसेच त्यांनी महाविद्यालयाचे IQAC समन्वयक म्हणून महाविद्यालयास ‘अ’ श्रेणी प्राप्त करून देण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
समाजकार्य महाविद्यालय जळगावच्या नियमीत प्राचार्य पदी डॉ. राकेश पितांबर चौधरी यांची नियुक्ती झाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष आ. शिरिषदादा चौधरी , संस्थेचे उपाध्यक्ष मा. सुनील पाटील , सचिव प्राचार्य डॉ. पी. आर. चौधरी आणि संस्थेचे संचालक मंडळ यांनी देखील त्याचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच संपूर्ण मधुस्नेह परिवार तसेच समाजकार्य महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्याकडून देखील शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.