भुसावळ: भुसावळ रेल्वे परिमंडळात कार्यरत असलेले लोकोपायलट गुड्स (मालगाडी चालक) एम.के.दोचनिया आणि त्यांचे सहायक यांनी ३० एप्रिल रोजी ९ तास ड्युटी केल्यानंतर रेल्वे प्रशासनाकडून रितसर स्लीप मागितली मात्र प्रशासनाने त्यांच्यावर दबाव आणून सदरील गाडी खांडवापर्यंत पोहोचवून येण्यास सांगितले. मात्र दोचनिया यांनी थकल्याचे कारण देत लेखी स्वरुपात समस्या सांगितली. त्यानंतर रेल्वे प्रशासनाने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. याविरोधात राष्ट्रीय रेल्वे मजदूर युनियनने तातडीची बैठक घेऊन लोकोपायलट एम.के.दोचनिया आणि त्यांचे सहायक यांचे निलंबन रद्द करण्याची मागणी केली आहे. शुक्रवारी 3 में रोजी ही बैठक घेण्यात आली. या बैठकीत रिक्त पदे भरण्याची देखील मागणी करण्यात आली.
यावेळी रेल्वे मजदूर युनियनचे मंडळ सचिव आर.आर.निकम, मंडळ अध्यक्ष पुष्पेंद्र कापडे, मुख्यालय कार्यकारी अध्यक्ष ए.बी.धांडे, शाखा सचिव ए.टी.खंबायत, एस.एस.वानखेडे, ए.ए.हांडे, आर.पी.भालेराव, प्रदीप गायकवाड, डी.बी.महाजन, एस.बी.तळेकर, अनिल मालवीया, मोहम्मद अस्कद, व्ही.डी.राणे, अभिषेक मिश्रा, आर.के.पांडे, राम प्रजापती, पराग पाटील, संदीप पाटील, एच.के.चौरसिया, एस.के.सिन्हा, अर्जुन इंगळे, आर.एम.चौधरी, एम.पी.चौधरी, जे.एस.सोनवणे, एम.बो.बोंडे आदी उपस्थित होते.
रेल्वे प्रशासनाने मनुष्यबळाचा तुटवडा असल्याने लोकोपायलट यांना १२-१२ तासापेक्षा अधिक काम करावे लागत आहे. भुसावळ मंडळात १०८ जागा रिक्त आहेत, ही रिक्त पदे भरण्यात यावी अशी मागणी या बैठकीत करण्यात आले आहे.