लोटरीचे आमिष दाखवून 57 हजारांना गंडवले

0

कल्याण : कल्याण पुर्वेकडील कोळशेवाडी परिसरात जरीमरी नगर,गायकवाड चाळीत राहणाऱ्या सदर पीडित महिलेला तिच्या पतीच्या मोबाईल वर फोन आला .फोन वर बोलणाऱ्या राज मल्होत्रा नावाच्या इसमाने या महिलेला तुम्हाला 12 लाख 80 हजारांची लॉटरी लागली असल्याचे सांगितले.

तसेच ही रक्कम मिळवण्याकरिता तिच्याकडेवेळोवेळी पैशांची मागणी केली .त्यानुसार या महिलेने तब्बल 57 हजार 8आठशे रुपये या इसमाच्या बँक खात्यावर टाकले .मात्र महिनाभराचा कालावधी लोटला मात्र रक्कम न मिळाल्याने सदर महिलेला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले .त्यामुळे या महिलेने कोळशेवाडी पोलीस स्थानक गाठत राज मल्होत्रा या इसमाविरोधात तक्रार दाखल केली असून या तक्रारी नुसार पोलीसानी या इस्माविरोधात तक्रार दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे.