लोणावळ्यात पावसाचा जोर; ४८ तासांत १०३२ मिलिमीटरची नोंद

0

लोणावळा : मागील तीन ते चार दिवसांपासून लोणावळा शहर आणि परिसरात पावसाचा जोर वाढला आहे. गुरुवारी सकाळी सात पर्यंत लोणावळ्यात 1032 मिलिमीटरची नोंद झाली आहे. लोणावळा शहरात मंगळवारी सकाळी 7 वाजल्यापासून गुरुवारी सकाळी 7 वाजेपर्यंत 48 तासात एकूण 270 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली. सलग कोसळत असलेल्या या पावसामुळे लोणावळा शहरातील आणि शहरालगत असणार्‍या धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ होऊ लागली आहे. यात प्रामुख्याने वलवन डॅम, पवना डॅम, लोणावळा डॅम, तुंगार्ली डॅम यांचा समावेश असून भुशी धरण यापूर्वीच ओव्हरफ्लो होऊन वाहू लागले आहे.

शेतकरी झाला चिंतामुक्त
जुन महिन्याच्या सुरवातीला दमदार हजेरी लावणार्‍या मान्सूनने महिन्याच्या अखेरीस तसेच चालू जुलै महिन्याच्या पहिल्या दोन दिवसात अचानक ओढ दिली. त्यामुळे शेतकर्‍यांसह सर्वांनाच काळजी पडली होती. मात्र मागील दोन दिवसात सातत्याने बरसणार्‍या पावसाने ही काळजी दूर झाली. गुरुवारी देखील लोणावळा शहराला आणि आजूबाजूच्या परिसराला पावसाने झोडपून काढले. त्यामुळे शहरातील अनेक रस्त्यावर पाणी भरण्याच्या घटना घडत होत्या. तर शहरात अनेक ठिकाणी झाडे देखील तुटून पडली.