लोणावळा : माहिती अधिकार कायद्यानुसार दोन पेक्षा अधिक वेळा माहिती मागविणार्या नागरिकांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा आशा प्रकारचे पत्र काढणार्या महावितरण कंपनीचा तसेच कंपनी अधिकार्यांचा लोणावळा शहरात निषेध करण्यात आला.
मावळ तालुका विजवीतरण समिती सदस्य सुनील तावरे यांनी त्यांच्या सहकार्यांसोबत लोणावळा महावितरण कार्यालयात जाऊन सदर निषेध नोंदविणारे निवेदन तेथील अधिकार्यांना दिले. माहिती अधिकारात माहिती मागविणार्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यासंदर्भातील पत्र वीजवितरण कंपनी कडून मागे घेण्यात आले असले तरीही हे पत्र म्हणजे भारतीय लोकशाहीने नागरिकांना दिलेल्या अधिकारावर एक प्रकारे घाला असल्याचे सांगत भविष्यात पुन्हा अशी चूक केली जाऊ नये असा सल्ला वजा इशारा सुनील तावरे यांनी विजवीतरण कंपनी तसेच अधिकार्यांना दिला.